
स्वामिनी फार्मा प्रॉड्युसर कंपनी & स्वामिनी ट्रेडर्स उद्घाटन सोहळा संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,६:-मालेगांव तालुक्यातील दुबळवेल येथे युवा उद्योगक गोपाल भाऊ देवढे यांनी पुढाकार घेऊन, स्वामिनी फार्मा प्रॉड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतीला पर्यायी असलेले, चिया सारख्या पिकाचे processig unit उभे करून. अनेक युवा शेतकरी मंडळीसाठी एक चांगला आदर्श उभा केला. आज शेती मध्ये बदलत्या हवामानानुसार आपल्या पारंपारिक सोयाबीन, हरभरा या पिकांची उत्पादन क्षमता कमी होतं आहे,आणि अश्या परिस्थितीमध्ये अनेक युवा शेतकरी चिया सारख्या पिकाचा पर्याय अवलंबत आहेत. आपण जर बघितले तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये चियाला मोठी मागणी होत असताना आपल्या शेतकऱ्यांना आपल्याच जिल्ह्यामध्ये दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आज स्वामिनी फार्मा प्रॉड्युसर कंपनीचे चिया processing unit महत्वाचे ठरणार आहे. असे विचार उद्घाटन प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख *संजनाताई गवळी पाटील* यांनी व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी योगेशजी कुंभेजकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घुले मॅडम, ज्येष्ठ पत्रकार माधवरावजी अंभोरे, वाशिम नगराध्यक्ष अनिलजी केंदळे, शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, विजय खानझोडे , जिल्हा समन्वयक गजानन शिंदे सर,शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप पाटील कुटे, उपजिल्हाप्रमुख मंगेश महाराज घुगे, लक्ष्मणरावजी गावंडे, संजय भुतेकर,तालुका समन्वक विलासराव जाधव, राजेश कव्हर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
