
पोलीस अधीक्षक कार्यालयातून सेवा पुस्तिकेची चोरी ! गुन्हा दाखल करण्याची सेवानिवृत्त ए.एस.आय मोरे यांची मागणी
वाशीम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
ता. २८ सध्या मालेगाव येथील अडोळ कॉलनीतील रहिवासी असलेले तेजराव आनंदराव मोरे यांनी पोलीस विभागात दीर्घकाळ सेवा देऊन रिसोड पोलीस स्टेशन येथून ए.एस.आय पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातच मुळ सेवापट जमा असल्याने त्यांनी पेंशनसाठी ‘कार्यालयाने तुमचा पेंशन प्रस्ताव संबंधित कार्यालयात पाठवला आहे असे सांगितले.परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी मोरे यांचे सेवापट चोरी केल्याची तक्रार तेजराव मोरे यांनी ता.२० फेब्रुवारी रोजी वाशीम शहर पोलीस स्टेशनला देवून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तेजराव आनंदराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, मी महाराष्ट्र पोलीस विभागात अमरावती परिक्षेत्र मधील अकोला येथे १९८२ रोजी पोलीस भरती झालो होतो. अकोला येथे नोकरी करुन सन १९९३ साली कारंजा पोलीस स्टेशन व वाशीम जिल्हा निर्मीती झाली तेंव्हापासून वाशीम जिल्ह्यात सेवा करुन रिसोड पोलीस स्टेशन येथूनए.एस.आय. पदावरून सेवानिवृत्त झालो. त्या काळात आस्थापन शाखेत सेवानिवृत्ताचे कामकाज बघणारे कारकून यांनी २०१८ मध्ये मला बोलावून माझे मुळ सेवापट महालेखापाल कार्यालयात नागपूर येथे एकूण २८ कर्मचाऱ्यांची सेवापट पाठविण्यात आले आहेत असे सांगितले . महालेखापाल कार्यालयात माझे सेवापट प्राप्त झाल्याबाबत स्वाक्षरी आहे.त्यानंतर सेवा पटाची पडताळणी होवुन एकूण २८ सेवापट पैकी २६ सेवापट ए.जी कार्यालयातून वाशिम कार्यालयात प्राप्त झाल्याचे.कार्यालयातील बाबू यांनी मला बोलावुन सांगितले.सेवापट पाठविल्याच्या ओ.सी. मध्ये माझ्या नांवाची नोंद नसून मला माझे दुय्यम मुळ सेवापट परत केले नाही.माझे सेवापट मला परत करण्याची मागणी वारंवार करूनही ते मला दिले नाही.याचा अर्थ माझ्या सेवापटाची चोरी करून मला त्रास दिला आहे.पेंशनबाबत वेळोवेळी विचारले असता नंतर माझे सेवापट अमरावती येथून एस. पी. कार्यालयात पाठविण्यात आल्याचेसांगितले. माझे सेवापट चोरीला गेल्यावर सेवासीट नसताना कार्यालयातील बांबूनी मला तात्पुरते पेंशन लागू केले. याबाबत सेवाशिट बाबत वारंवार विचारणा केली. परंतु कोणतेच उत्तर मिळाले नाही. सेवापट मिळावे म्हणून मी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर मला अंदाजे पेंशन लागू केले आहे. परंतु, माझ्या सोबतच्या ए.एस.आय पेंशनधारकांना माझ्यापेक्षा ३५०० रुपयाने जास्तीचे पेंशन आहे.त्यामुळे माझे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती सुद्धा दिली नाही.तसेच सर्व्हिस सिट नसताना मला पेंशन कोणत्या आधारे लागु केले ?असे अनेक वेळा मोरे यांनी कार्यालयात विचारले असता कार्यालयातून माहिती दिली नाही.मागिल सात वर्षांपासून तेजराव मोरे सर्व्हिस सिटची मागणी करीत आहेत. अखेर कंटाळून तेजराव मोरे यांनी वाशीम शहर पोलीस स्टेशनला ता.२० रोजी लेखी तक्रार दाखल करून संबंधित आधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तेजराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, कार्यालय प्रमुखांनी फाईलचा आढळ होत नाही, मिळून येत नाही अशी उत्तरे देता येणार नाही. महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट 2005 नुसार सरकारी फाईल गहाळ होणे, फाईल हरवली फाईल सापडत नाही. ती सरकारी नुसार डिस्ट्रॉय न करणे, हे सर्व कायद्यातील कलम ८,९ नुसार गंभीर अपराध आहे. सार्वजनिक अभिलेख कायद्यानुसार तो गुन्हा आहे.आता पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर काय कारवाई करणार आहे याकडे सम्पूर्ण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर मला दुय्यम सेवा पटाची प्रत दिली नाही तर;मी.ऊच्य न्यायालयात विवेक अनुरूप कुलकर्णी यांच्या प्रमाणे,विरुद्ध महाराष्ट्र राज्य रिट पिटीशन दाखल करून वाशिम व ए.जी.नागपूर येथील कार्यालयातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कलम ८ व ९, नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
