राजीव गांधी विद्यालय शेलगाव येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

मालेगाव तालुक्यातील ग्राम शेलगाव ओंकारगिर येथील राजीव गांधी विद्यालय शेलगाव येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने

विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. ए .वाझुळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रास्ताविक पी.एम.कुटे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक एस.वी.खाडे,वी.के.कांबळे,आर.एल.साबळे,पी.ए.पत्रे , त्यांनी कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली.एस.बी.लहाने,जी.डी. वांझुळकर,एस.वी. लहाने ,डी.एन.खंडारे,ए.के.वाझळकर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. याप्रसंगी गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियान विषयी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या, विद्यालयाचे मुख्याध्यापक जि.ए.वाझुळकर यांनी आपल्या सुश्राव्य कोमल वाणीने देवकीनंदन गोपाला हे गीत गायल्यामुळे उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद एकाग्र झाले. कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जय घोषणे ने देवकीनंदन गोपाला या सामूहिक गजराने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *