युवा तांत्रिक कामगार संसद राज्य मुख्य समन्वयक पदी देवेद साळुंके

युवा तांत्रिक कामगार संसद राज्य मुख्य समन्वयक पदी देवेद साळुंके

वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने

वाशीम :- तांत्रिक कामगार युनियन र. नं. 5059 या संघटनेच्या वतीने राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील तांत्रिक कामगारांच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या नवी दिशा नवा विचार या ध्येयवाक्यानुसार युवा नेतृत्वाला संधी देत युवा तांत्रिक कामगार संसद निर्माण केली असून राज्य मुख्य समन्वयक पदावर देवेंद्र साळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहीती तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.तांत्रिक कामगारांच्या न्याय हक्कांसाठी, प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्याच पार्शवभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे या सोबत महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीच्या परिमंडळ स्तरावर प्रत्येक 2 युवा तात्रिक कामगाराना समन्वयक या पदावर निवड करण्यात आली आहेसंघटनेत सातत्याने कार्यरत राहून कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेतृत्वाला ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवा तांत्रिक कामगारांचे संघटन अधिक बळकट होईलया निवडीमुळे राज्यातील तांत्रिक कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या आगामी संघटन विस्तार मोहिमेला गती मिळणार असल्याचा विश्वासतांत्रिक कामगार यूनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर , केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले , बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम , नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *