अमानी येथे आरोग्य मेळाव्यात ११२ लोकांचे नेत्रतपासणी व ७९ लोकांना चष्म्याचा वाटप

अमानी येथे आरोग्य मेळाव्यात ११२ लोकांचे नेत्रतपासणी व ७९ लोकांना चष्म्याचा वाटप (जि प शाळेत आरोग्य मेळावा शिबिर ,व नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ केंद्रीय शाळेत आरोग्य मेळावा शिबिराचे उद्घाटन संपन्न, शिबिरा अंतर्गत, पात्र गोरगरीब महिला पुरुषांनची नेत्र तपासणी,व गरजू लोकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप देशमुख वाशिम, यांच्या प्रमुख हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून याप्रसंगी मा जि प स अशोक गवळी, मा .उपसरपंच अनिल जाधव, गणेश गवळी फौजी, मंगेश गवळी, गोपाल गवळी,व डॉक्टरमंडळी उपस्थित होती, या आरोग्य मेळाव्यात जवळपास ११२ जनांची नेत्र तपासणी करून,७९ गरजुनां मोफत चष्मा वाटप करण्यात आला, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे हार व पुष्प अर्पण उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच कार्यक्रमाचे आयोजक गोपाल गवळी भाजपा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष, यांच्या वतीने मित्र मंडळानी सर्व पाहुण्यांची शान व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी अशोक गवळी, राजू सांगळे, अशोक प्रल्हाद गवळी, तसेच सत्कारमूर्ती भाजपा, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप देशमुख , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राम विजय जाधव,यांनी आपले मनोगत व्यक्त केले, राजकारणा सोबतच समाजसेवा करणे महत्वाचं असल्याचं वकत्यांनी सांगितले गावकऱ्यांनी यावेळी शिबिराद्वारे चांगलं कार्य केले म्हणून आयोजकाचे आभार मानले, कार्यक्रमाला, अशोक गवळी मा.जि प सदस्य, प्रदीप देशमुख भाजप परिवार जिल्हा मोर्चा अध्यक्ष, राम जाधव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, राजू सांगळे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस, गजानन नवघरे मा ता अध्यक्ष, नागेश बळी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बनसोडे मुख्याध्यापक ,वैभव वायचाळ, तुषार मांडे, अशोक प्र .गवळी, विवेक गवळी,अनिल जाधव, गणेश गवळी,तेजस आरू, अरून गवळी, संतोष गवळी,भारत गवळी,शुभम गवळी, दिलीप मोरे, हरीश गवळी,पंढरी गवळी यांच्या सह गावातील नागरिक, युवक उपस्थित होते यावेळी रत्नेश्वर क्रीडा मंडळाच्या युवकांना कीट वाटप प्रदीप देशमुख यांच्या वतीने करण्यात आले, प्रास्ताविक व संचालन मंगेश गवळी बजरंग दल तालुका अध्यक्ष मालेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल गवळी भाजपा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *