
जाधव महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारोप संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने
श्री तुळशीरामजी जाधव कला विज्ञान महाविद्यालय वाशिम राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम हिवरा गणपती या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा समारोप समारंभ संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणपती संस्थान हिवराचे सदस्य संजाबराव देशमुख हे लाभले होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. जि. प. सदस्य दिलीपराव देशमुख, महादेव सोळंके, रामभाऊ जाधव, अजिंक्य जाधव, विश्वासराव देशमुख डॉ पदमानंद तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. तसेच सात दिवशीय शिबिरा दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार समारोपीय कार्यक्रमांमध्ये करण्यात आला. आणि ज्या गावकऱ्यांनी शिबिरासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला अशा गावकऱ्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविकामधून डॉ. पदमानंद तायडे यांनी शिबिराचा आढावा घेत सात दिवसांमध्ये केलेल्या संपूर्ण कार्याचा अहवाल मांडला त्याचप्रमाणे गावाच्या पुढील वाटचालीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येय धोरणे मांडली. समारोप प्रसंगी आपले मनोगत मांडताना गावकऱ्यांनी भावपूर्ण शब्दांत स्वयंसेवकांना निरोप देत असल्याचे दिसून आले.समारोपाच्या प्रसंगी माननीय दिलीपराव देशमुख यांनी असे विचार व्यक्त केले की हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले असून यापुढे गावातील लोकांची भूमिका आहे की त्यांनी या कार्याचा वसा घेऊन आपल्या गावाला स्वच्छ सुंदर बनवावे. त्याचप्रमाणे महादेवराव सोळंके यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकांना प्रेरणादायी अशा शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी या शिबिराच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या सहकार्य शिवाय हे शिबिर पूर्ण होऊ शकले नसते असे विचारही याप्रसंगी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता काकडे या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रिंकू रुक्के यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉ संतोष धामणे, डॉ. संतोष इंगोले, डॉ .विजय जाधव, पंजाबराव देशमुख , दिलीपराव देशमुख, किशोर राव देशमुख, बालाजी देशमुख, सुधीर चौरे, सुभाष पवार त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
