शिरपूर येथे कुस्त्याच्या दंगलात विशेष आकर्षण भारत vs नेपाळ कुस्ती

शिरपूर येथे कुस्त्याच्या दंगलात विशेष आकर्षण भारत vs नेपाळ कुस्ती

मालेगांव जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव )

शिरपूर येथे दि २० रोजी महाशिवरात्री निमित्त होणाऱ्याकुस्त्यांच्या दंगलीत आकर्षण म्हणून भारती नेपाळ ही कुस्ती होणार आहे. सदर कुस्ती ७१हजाराची आहे. येथील महाशिवरात्री निमित्त दरवर्षी कुस्त्यांचा दंगल असतो, यात इतर महत्वाच्या कुस्त्या सोबतच विशेष ठरणारी कुस्ती श्री जानगीर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री ओंकार कुस्तीगीर मंडळ शिरपूर यांच्या वतीने आयोजित भव्य निकाली कुस्त्याच्या महासंग्रामात दि. २० फेब्रुवारी रोजी विदर्भाच्या इतीहासातील मोठे मल्लयुद्ध देवा थापा पैलवान व नवीन चव्हाण हिमाचल प्रदेश यांच्यात म्हणजेच भारती नेपाळ राहणार आहे. सदर कुस्ती ७१००० हजार रुपयाची राहणार आहे. या स्पेशल कुस्तीचे प्रायोजक नामदेव भांदुर्गे, ज्ञानमाऊली कन्ट्रक्शन, सुनिलभाऊ गाभणे, अलोक सप्लायर्स, प्रशांत देशमुख जय माता दी कन्स्ट्रक्शन, मुस्तकीम पठाण, सरकार कन्ट्रक्शन, कैलास खोटे राधाकृष्ण सप्लायर्स, अशोक मोरे, मां गंगा कन्ट्रक्शन, महेश देशमुख, जय माता दी दूध डेरी, सोनू बोराटे, दत्तकृपा सप्लायर्स, युपिन कव्हर, तिरुपती कन्ट्रक्शन, बबलु देशमुख हे आहेत, सदर कुस्तीचे स्थळ श्री समर्थ जानगिर महाराज संस्थान शिरपुर जैन जि. वाशिम हे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *