ऐतिहासिक निर्णयाने कलाल समाजात जल्लोष संत सावजी महाराजांच्या नावावरील जागेची अधिकृत मोजणी पूर्ण

ऐतिहासिक निर्णयाने कलाल समाजात जल्लोष; संत सावजी महाराजांच्या नावावरील जागेची अधिकृत मोजणी पूर्ण

शेगाव:प्रतिनिधी:(गजानन ददगाळ)

पंढरपूर, दि. ११ फेब्रुवारी २०२६ :श्री क्षेत्र पंढरपूर येथे आज कलाल समाजासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला. कलाल समाजाचे आराध्य दैवत श्री संत सावजी महाराज यांच्या नावावर असलेल्या सुमारे ८ ते १० हजार चौरस फूट जागेची अधिकृत मोजणी सर्व प्रशासकीय अधिकारी व पोलिस बंदोबस्तात पार पडली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही प्रक्रिया आज पूर्ण होत जागा कायमस्वरूपी महाराजांच्या नावावर निश्चित करण्यात आली.या कार्यासाठी सावजी महाराजांच्या वारसदारांनी दीर्घकाळ सातत्याने प्रयत्न केले होते. विशेषतः काकपुरे महाराज व रामभाऊ धामंदे यांनी या प्रकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.सुमारे महिनाभरापूर्वी काकपुरे महाराज व रामभाऊ धामंदे यांनी अखिल भारतीय साव कलाल समाज समितीचे केंद्रीय अध्यक्ष सुनीलभाऊ खराटे यांची भेट घेऊन जागेच्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती दिली व सहकार्याची विनंती केली. त्यावेळी केंद्रीय सचिव सुनील राऊत तसेच प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र जयस्वाल उपस्थित होते.समाजकार्याला तत्पर असलेले केंद्रीय अध्यक्ष सुनीलभाऊ खराटे यांनी तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणांशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री चंद्रशेखरजी बावणकुळे यांची भेट घेऊन या कामासंदर्भात मान्यता मिळवली. मंत्री बावणकुळे यांनी स्वतः सोलापूर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला दूरध्वनीद्वारे तातडीने व नियमानुसार मोजणी करण्याचे निर्देश दिले.त्या अनुषंगाने आज दि. ११-०२-२०२६ रोजी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. केंद्रीय अध्यक्ष सुनीलभाऊ खराटे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेत पुढाकार घेतला. त्यांच्या सोबत केंद्रीय सचिव सुनील राऊत व प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र जयस्वाल उपस्थित होते.काही ठिकाणी अतिक्रमणाची शक्यता व गुंड प्रवृत्तींची माहिती असतानाही समाजहितासाठी ठामपणे उभे राहण्याचे धैर्य दाखविल्याबद्दल सुनीलभाऊ खराटे यांचे समाजात विशेष कौतुक होत आहे.यावेळी बोलताना सुनीलभाऊ खराटे म्हणाले, “ही केवळ सुरुवात आहे. संत सावजी महाराजांचे भव्य स्मारक मंदिर आणि भक्तनिवास उभारण्याचे कार्यही आम्ही लवकरच पूर्णत्वास नेऊ.”संत सावजी महाराजांच्या सर्व नातेवाईकांसह केंद्रीय समितीचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने हा सोहळा अधिक ऐतिहासिक ठरला.आजचा दिवस कलाल समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यांचा सहयोगामुळे :प्रशांत चंद्रकांत जाधव लक्ष्मण ज्ञानदेव वाघारे बापूसाहेब रामचंद्र पाटील विशांत बापूसाहेब पाटील कांता गणोजे शिवाजी आप्पा कोळी गणेश भाऊसाहेब सोमवंशी चंद्रकला पुरुषोत्तम दुधारे विमल धामंदे वेणूबाई हरिभाऊ काकपुरे श्रीकृष्ण हरिभाऊ काकपुरे मदन हरिभाऊ काकपुरे शुभदा श्रीधर बोरकर प्रतिभा बिजवार दत्ता पंत रामचंद्र डगवार सीमा प्रवीण चीलात्रे प्रफुल दत्ता पंत डगवार बलराम रामभाऊ काकपुरे सुदाम रामभाऊ काकपुरे कांता अरुण गनोजे वृंदा सावळे सुविधा नाईक केशव काकपुरे सुनंदा भामकर विलास मावळे अरविंद मावळे प्रभा कसणारे वंदना पहाडे प्रवीण मावळे बिपिन चिलात्रे सुलभा मोहिते संपत वाघाटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *