
वेळेवर उपचारांमुळे पत्नीचे प्राण वाचले; उमेश शेळके व राजूभाऊ भोर यांचे चव्हाण कुटुंबीयांकडून आभार
तालुका शेगाव प्रतिनिधी:(अनिता इंगळे)
केंद्रीय आयुष, स्वातंत्र्य प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. प्रतापराव जाधव साहेब यांच्या सहकार्याने तसेच भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख राजूभाऊ भोर व युवा सेना तालुकाप्रमुख शेगाव उमेश शेळके पाटील यांच्या तत्परतेमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबई येथे असताना दत्तात्रेय मनोहर चव्हाण यांच्या पत्नीची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. अशा कठीण प्रसंगी उमेश शेळके यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत रुग्णालयात योग्य व वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या शिफारशी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे चव्हाण यांच्या पत्नीवर योग्य उपचार होऊन ती सुखरूप घरी परतली.या मोलाच्या मदतीबद्दल दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनी उमेश शेळके व राजूभाऊ भोर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “कठीण काळात दिलेली साथ आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील. तुम्हीच खऱ्या अर्थाने समाजसेवक आहात,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
