
प्रगट दिनानिमित्त अमानी येथे, महिलांकडून पारायण वाचन नंतर महाप्रसाद वाटप
मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील ग्राम अमानी येथील श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थांजवळ प्रगट दिनानिमित्त आज महिलांच्या वतीने पारायण वाचनाचा कार्यक्रम झाला नंतर गजानन बाबाची पूजा आरती करण्यात आली, पारायण वाचन पांगरी नवघरे येथील सौ शोभा नंदु नवघरे यांनी केले, आरती ला माजी आमदार विजयराव जाधव, तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते, संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता, गावातील बहुसंख्य सेवाधारी महिलांनी पारायण वाचन केले ,त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा वाटप करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचा लाभ गावातील भावीकांनी महिला तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला अमानी येथे, समस्त गावकऱ्यांच्या वतीने लोक वर्गणी मधून संत गजानन महाराजांचे भव्य असे मंदिरांचे बांधकाम केलेले असून येथे दर गुरुवारी गावातील अन्नदात्याकडून खिचडी वाटप तसेच प्रसादाचा वाटप करण्यात येत असून रोज सकाळी व सायंकाळी पूजा आरती नियमित करण्यात येत असते यासाठी भाविकांची उपस्थिती असते आज प्रगट दिनानिमित्त गावातील मारुतीच्या मंदिराच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे गावातील लोकांच्या वतीने सकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आला होता ,तसेच गजानन महाराज संस्थान जवळ देखील भव्य असे महाप्रसाद वाटप करण्यात आला होता संस्था जवळ नुकतेच माजी आमदार विजयराव जाधव यांच्या प्रयत्नाने पंचवीस लाख रुपयाची पेवर ब्लॉकचे काम करण्यात आलेले असून , मंदिराचे बांधकाम करण्यापूर्वी येथे , माझी जि प सदस्य उषा अनिल जाधव यांनी हावारीकरण व तार कंपाउंड साठी निधी प्राप्त करून दिला होता, येथे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येत असतात येथे भव्य दिव्य असे सभागृह चे काम करण्यात यावे अशी मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे, संस्थांच्या वतीने शेषरावजी गवळी यांनी पाहुण्यांचे आभार मानले तसेच प्रसाद वाटण्याकरिता संस्थांचे पदाधिकारी तसेच युवा मंडळीने व गावकऱ्यांनी सहकार्य केले
