ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई

ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ठिकाणी छापे; अडीच लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जळगाव जामोद : ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत आरोपींना रंगेहाथ पकडत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण अडीच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्या फिर्यादीवरून धानोरा महासिद्ध येथील सुधाकर खूपसे पाटील यांच्या शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत ₹1,28,220/- किमतीचा मुद्देमाल जप्त करत संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.तसेच जळगाव जामोद शहरातील पीएम मॉलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या दुसऱ्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या ठिकाणाहून ₹1,06,070/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व कॉन्स्टेबल प्रफुल डबे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत अमोल पंडित पोलीस उपनिरीक्षक पोलीस .शेख आयुब,कॉन्स्टेबल शेख इरफान, प्रफुल डबे, समाधान शिंगणे, सचिन शेळके. शांतीलाल धीरबसी. मंगेश सोळंके,गजानन साताव विलास पहाड.PC अर्जुन सोरमारे, राहुल सोनोने, अनिकेल येवले, पवन साखरे.पुढील तपास सुरु आहे

मराठी समाचार न्यूज 24 साठी मुख्य संपादक नागेश भटकर यांचा स्पेशल रिपोर्ट “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *