
नेहरू युवा केंद्र बुलढाणा द्वारा आयोजित मेरा भारत युवा खेल स्पर्धा 2026 संपन्न
जावेद शहा सहसंपादक
नेहरू युवा केंद्र बुलढाणा व अरुनोदय क्रीडा मंडळ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने मेरा भारत युवा खेल क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्थानिक मथाबाई चौक येथील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर दिनांक 6 जानेवारी रोजी घेण्यात आलेसदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नेहरू युवा केंद्र बुलढाणा युवा अधिकारी प्रणितजी सांगवी सर प्रमुख उपस्थिती गणेशभाऊ दांडगे नगराध्यक्ष नगरपरिषद जळगाव जामोद तसेच प्रवीण डाबरे सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद येऊल तालुका क्रीडा समन्वयक यांनी केले नियमित सरावामुळे शरीर सुदृढ बनते आणि सुदृढ शरीर हे समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रणित सांगवी सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले सदर क्रीडा स्पर्धा ह्या खो खो 100 मीटर धावणे व गोळा फेक यामध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये मुला-मुलींमधून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भिंगारा यांनी विजय केला तर मुलींमधून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ द्वितीय तर डॉक्टर आंबेडकर विद्यालय तिसऱ्या क्रमांकावर राहिला मुलांमधून अरुणोदय क्रीडा मंडळ द्वितीय तर सातपुडा क्रीडा मंडळ तिसऱ्या क्रमांकावर राहिला स्पर्धा आयोजन करिता वंदना कतोरे , सुरपाल चव्हाण, प्रतीक राऊत, आदित्य कपले, गणेश जोशी सर यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली
