
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव जामोद : प्रतिनिधी :– या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, तसेच पक्ष्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.शहरातील विविध भागांत पोलिस पथकांनी छापे टाकून नायलॉन मांजाचे साठे जप्त केले. संबंधित विक्रेत्यांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नायलॉन मांजाचा वापर करू नये तसेच अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. भविष्यातही नायलॉन मांजाविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
