नगरपरिषद उपाध्यक्ष नेमका कोण होणार

नगरपरिषद उपाध्यक्ष नेमका कोण होणार ? मुस्लिम समाजाशी संवाद साधणार का?

सहसंपादक जावेद शहा

नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरात उपाध्यक्षपदाबाबत चर्चा रंगू लागली आहे. नेमकी कोणाची उपाध्यक्षपदी वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, उपाध्यक्ष निवडीसंदर्भात मुस्लिम समाजामध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. उपाध्यक्षपदाचा उमेदवार मुस्लिम समाजाशी थेट संवाद साधणार का, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न यावर उपाध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे निवड होणारा उपाध्यक्ष सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणार का, याकडे मुस्लिम समाजासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे.
आगामी काही दिवसांत उपाध्यक्षपदाचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतरच समाजाशी संवादाबाबतची भूमिका समोर येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *