अमोल टप व सहका-यांकडून भाजपच्या पदांसह सक्रिय सदस्यत्वाचे राजीनामे

अमोल टप व सहका-यांकडून भाजपच्या पदांसह सक्रिय सदस्यत्वाचे राजीनामे

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूरः नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपाच्या वतीने तिकीट वाटपात सध्या कार्यकयीना डावलून चेहरे पाहून व संबंध जोपासीत उमेदवारी दिल्याचा ठपका ठेवित भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह बऱ्याच पदाधिकारी व पक्षाच्च्या सदस्यांनी आज २४ डिसेंबर रोजी आपल्या पदासह सक्रीय सदस्यत्वाचे राजीनामे शहराध्यक्ष संतोष बॉबटकार यांच्याकडे दिले. निवणुकीनंतर भाजपामध्ये सुरू झालेल्या या राजीनामा सत्रामुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अमोल टप यांचेसह आदींनी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, नुकत्याच नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकांमध्ये सक्रीय पदाधिकारी व कार्यकत्यांना डावलून उमेदवारी देतांना चेहरे पाहून व संबंध जोपासत उमेदवारी देण्यात आली. मी गेल्या कित्येक वर्षापासून भारतीयजनता पार्टीचा एक सच्चा कार्यकती म्हणून काम करीत होतो. तसेच गत् काळात मी शहरामध्ये पक्षीय वाढीसाठी आवश्यक ते सर्व कामे केली आहेत. तसेच मी राहत असलेल्या प्रभाग क्र.३ मधील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे काढणे यासह सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले होते. याच अनुषंगाने भी पक्षाकडे प्रभाग क्र. ३ अ मधून उमेदवारी मागितली होती, मात्र माझ्या उमेदवारीला डावलून व राजकीय द्वेषभावनेतून मला व माझ्या सहकाऱ्यांना या निवडणुकीतून दूर ठेवण्याचा कुटील डाव पक्षाकडून खेळल्या गेला. मी याच प्रभागातील बुथ क्र. १७० था बुथ प्रमुख सुध्दा आहे. पक्षासाठी अहोरात्र झटूनही सच्चा कार्यकत्यांना अशाप्रकारे डावलण्यात येते व त्यांच्या कार्याची कोठेही दखल घेतली जात नाही, ही बाब मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार करता व सहकाऱ्यांच्या चर्चेअंती अमोल लक्ष्मणराव टप शहर उपाध्यक्ष भाजपा मलकापूर,राजकुमार वानखेडे शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग भाजपा मलकापूर, सौ. दुर्गी राजकुमार वानखेहे शहर चिटणीस सामाजिक न्याय विभाग भाजपा मलकापूर, अमोल पाटील सदस्य, अमोल मोरे, रोहीत कांडेलकर, पंकज पाटील, सुरज टप, प्रसादटप, अनेश साखळीकर, विरेंद्र करसे, मंगेश चंदनकार, मयुर बुद्धकले, जय वाघमारे, अक्षय लामखेडे, स्वप्नील भिसे आदींनी आपल्या पदाचा व भाजपाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *