रायपूर येथे मनसे-शिवसेना युतीचा जल्लोष; ठाकरे बंधूंच्या ऐक्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण

रायपूर येथे मनसे-शिवसेना युतीचा जल्लोष; ठाकरे बंधूंच्या ऐक्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण

जावेद शहा रायपूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील अधिकृत युतीच्या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह रायपूर शहरातही आनंदाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राज्याच्या हितासाठी एकत्र आल्याच्या निर्णयाचे स्वागत करत, रायपूर येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केला.स्थानिक रायपूर मनसे च्या शाखे समोर येऊन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन “ठाकरे बंधूंचा विजय असो” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि गुलाल उधळून या ऐतिहासिक युतीचा आनंद व्यक्त करण्यात आला.मनसे आणि शिवसेनेची ही ऐतिहासिक युती झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून रायपूर येथील मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक पधाधिकार्याणी हातात हात घालून “हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही युती काळाची गरज होती,” अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मनसे तालुका उप अद्यक्ष अविनाश सुरडकर विभाग अद्यक्ष सागर इंगळे अंकुश बरँडवाल अजय सुरडकर समाधान राऊत सागर राऊत सोनू जाधव युवा सेना शहर प्रमुख अकील शेख समीर भाई इरफान भाई जमील भाई अकील खान असद भाई विजय घाडगे अभिब भाई यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *