
ज्ञानेश्वर गिरमेकर यांची रामटेक शिक्षक संघ शाखेच्या अध्यक्षपदी निवड
जावेद शहा रामटेक (प्रतिनिधी) राजेंद्र गायकवाड शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारी वाट संघटनेच्या बळावर घडते नवी घडामोड आज*…महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा रामटेकची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत सर्व सभासदांच्या एकमताने श्री. ज्ञानेश्वरजी गिरमेकर यांची रामटेक तालुकाध्यक्षपदी,तर श्री. अजय चव्हाण यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली.*अनुभवाच्या शिदोरीतून नेतृत्व उभं राहिलं*,*मृदू स्वभाव,ठाम भूमिका*… *विश्वास पुन्हा जिंकला*…दि. 20 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या सभेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, मृदू स्वभाव आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे श्री.गिरमेकर यांची निवड योग्य व अपेक्षित असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.*हक्कांचा लढा,प्रश्नांची साथ*,*शिक्षकांसाठी संघ राहील नेहमीच पाठ*…याप्रसंगी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणे व त्यांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडणे, हा संघाचा ठाम संकल्प असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.*एकजुटीची ताकद,संघटनेचा सूर*,*रामटेक शिक्षक संघ चालला नवा प्रवास करू*…या बैठकीस जिल्हा कोषाध्यक्ष अशोकजी झगडमवार,तालुका नेते नरेंद्रजी डबीत, बालचंदजी नाटकर,तसेच मनोहरजी वाढरे, दीपकजी रोकडे,मनोहरजी सोनटक्के,सुरेंद्रजी ठाकरे यांच्यासह अनेक शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
