
चिखली नगरपरिषद निवडणूक : उबेद अली खान यांचा दणदणीत विजयचिखली
जावेद शहा : चिखली नगरपरिषद निवडणूक : उबेद अली खान यांचा दणदणीत विजयचिखली नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून उबेद अली खान उर्फ भाईजान यांनी दणदणीत विजय मिळवला. प्रचंड जनसमर्थनाच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत विजयाची पताका फडकावली.निवडणूक प्रचारादरम्यान उबेद अली खान यांनी युवक, महिला, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा ठोस आराखडा मांडला. स्वच्छ प्रभाग, मूलभूत सुविधा, शिक्षण-आरोग्य सुधारणा आणि युवकांना रोजगाराच्या संधी या मुद्द्यांना त्यांनी विशेष प्राधान्य दिले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने यश मिळाले.विजयानंतर प्रतिक्रिया देताना उबेद अली खान म्हणाले, “हा विजय माझा नसून प्रभागातील मायबाप जनतेचा आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रभाग व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन.”या विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. उबेद अली खान यांच्या विजयामुळे चिखलीच्या राजकारणात एका युवा नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
