जित-कुने-दो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल चे 12 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर झेप.

जित-कुने-दो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल चे 12 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर झेप.

जावेद शहा दि 18 सप्टेंबर,शा. प्र.राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲन्ड ज्यु. क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 12 विद्यार्थ्यांची विभागीय शालेय जित-कूने-दो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 17/12/2025 वार बुधवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे विभागीय जित-कुने-दो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर चा 15 विद्यार्थ्यांचा चमू विभाग स्तरीय जित-कूने-दो स्पर्धेत सहभागी झाला होता.
यावेळी शाळेच्या 12 विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यां सोबत चुरशीची खेळी करत विजय मिळवला. यामध्ये अनुक्रमे 17 व 19 वयोगटात आराध्या ठाकूर, संजिवनी दांडगे, अश्विनी दांडगे, प्रेम ठाकूर, सुमीत कुडके, यश तरमळे, प्रथमेश गव्हाणे, धनंजय सोनाळकर, सानिका धनवे, आर्यन सिरसाट, सोहम गव्हाणे, शिवानी खंडागळे आदी विद्यार्थ्यांनी प्रथम येत त्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. या विजयामुळे क्रिडा क्षेत्रातील कामगीरी व परंपरा कायम असल्याची प्रतिक्रिया संस्था अध्यक्ष मा. संदिप दादा शेळके यांनी देत राज्यस्तरीय स्पर्धैसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट यांनी मेहनत घेतली तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. विजेता विद्यार्थ्यांचे शाळेच्या कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
🧘‍♀️🏌️‍♀️🤾‍♀️🤺⛹️‍♀️🤸‍♀️🤼‍♀️🏋️‍♀️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *