बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिल्या गेलेल्या बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी गंभीर आरोप

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिल्या गेलेल्या बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी गंभीर आरोप सुमारे २३ ते २५ कोटी रुपयांची बनावट जात वैधता प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप आहे.

जावेद शहा : बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिल्या गेलेल्या बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बंजारा समाज आरक्षण बचाव संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष राजेश फकीर राठोड यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्यावर खळबळजनक आरोप केले. मेरत यांनी जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सुमारे २३ ते २५ कोटी रुपयांची बनावट जात वैधता प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणात राज्य शासनाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, त्यात जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनीता राठोड यांचाही समावेश आहे. राजपूत भामटा समाजातील अनेकांना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सुमारे दोन हजार बोगस जात प्रमाणपत्रे दिल्याचे पुरावे असल्याचे राठोड यांनी सांगितले. या प्रकरणामुळे आपल्याला जीवाल धोका असल्याचा दावा करत, वारंवार हल्ले झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे शासनाने तात्काळ सुरक्षा देण्याची किंवा बंदूक परवाना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *