राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पद्धत लागू

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पद्धत लागू

जावेद शहा : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांना आता नामनिर्देशन अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून उमेदवारांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तसेच, प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व वेगवान होईल, असा आयोगाचा विश्वास आहे. ऑनलाईन नामनिर्देशनासोबतच आवश्यक कागदपत्रे, शपथपत्रे व इतर माहितीही डिजिटल स्वरूपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना व माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *