
रुई येथील शेतात बिबट्याने पाडला गाईचा फडशा
वीस दिवसात दुसरी घटना; परिसरात भीतीचे वातावरण
सहसंपादक जावेद शहा
अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्याचे वाढते आतंकामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी पंढरीनाथ प्रभाकर राजगुरू यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, गेल्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेल्या कालवडीच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मोठा आवाज आल्याचे कुटुंबीयांच्या कानावर गेले. लगेच शेतात धाव घेतली असता कालवडीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मानेला आणि अंगावर आढळलेल्या खोल जखमा पाहता हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी
वनपाल बी. एम. पाटील. वनरक्षक कैलास कदम. वनसेवक शेषराव राठोड. संतोष राठोड. पशु वैद्यकीय अधिकारी सिद्दीकी
घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली.
गावातील ग्रामस्थांच्या मते, केवळ वीस दिवसांपूर्वी गावाच्या दुसऱ्या टोकाला गाईवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व भीती दोन्ही वाढल्या आहेत. रात्री तर दिवसाही शेतात जाणे धोकादायक बनले असून पाळीव जनावरांना सांभाळणे कठीण होत आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की रुई परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले जाणार आहे. अंबड तालुक्यात सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बिबट्या आणि बिबट्य�
