सुखापूरीत पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

सुखापूरीत पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

प्रतिनिधी अंबड जावेद शहा

अंबड तालुक्यातील सुखापूरी येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रिये संदर्भात आज अधिकृत प्रसिद्ध नोटीस लावण्यात आली. सुखापूरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे मतदान केंद्र निश्चित असल्याने, निवडणुकीसंबंधित ‘जाहिर प्रसिद्धी’ची नोटीस चिटकवून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा नोंदविण्यात आला.या प्रक्रियेदरम्यान मंडळ अधिकारी विष्णू जायभाय, तलाठी देशमुख, ग्रामपंचायत ऑपरेटर रमेश लहुटे व ग्रामपंचायत शिपाई उपस्थित होते. नोटीस सुखापूरी ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध ठेवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे.आगामी दिवसांत मतदार यादी पडताळणी, कागदपत्र तपासणी आणि इतर निवडणूकविषयक टप्पे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राबविण्यात येणार आहेत. शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित निवडणूक पार पडावी यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज असल्याचे मंडळ अधिकारी जायभाय यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *