
बस स्थानकातील जेब कतऱ्यांचा एलसीबीने केला पर्दाफाश, दोन पैकी एक आरोपी अटक ! चोरीस गेलेले ३१.७०० रुपये हस्तगत
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
बुलढाणा : जळगाव जामोद व तामगाव बस स्थानक परिसरात घडलेल्या खिसे कापून चोरीच्या दोन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेनिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या निर्देशानुसार पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. आज दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव जामोद (गु.र.नं. ५३४/२०२५ कलम ३०३ (२) बीएनएस) व तामगाव (गु.र.नं. ३७२/२०२५ कलम

३०३ (२) बीएनएस) येथे बसस्थानक परिसरात झालेल्या चोरीच्या दोन्ही घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणले. या तपासात अभिषेक सदाशिव घोपे रा. खामगाव यास अटक करण्यात आली असून शंकर इंद्रभान घोडके रा. खामगाव हा आरोपी फरार असून त्याचा कसोशीने शोध सुरू आहे. चोरीस गेलेली एकूण ३३ हजार ७०० रुपयांपैकी ३१ हजार ७०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ही कारवाई पीएसआय पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल एजाज खान, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे व हेड कॉन्स्टेबल राजू आडवे यांनी पार पाडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर, नियोजनबद्ध व प्रभावी कारवाईमुळे बसस्थानक परिसरात जेब कतऱ्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास यश आले असून नागरिकांत समाधान व्यक्त केलेआहे.
