
ग्रामविकास अधिकारी यांच्या विविध विकास कामात गंभीर अनियमितता
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
ग्रामपंचायत रायपूर (ता. बुलडाणा) येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या विविध विकास कामात गंभीर अनियमितता,बाबत व बदली झाल्यावर राजकीय दडपण व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक संगनमत प्रकरणा बदली थांबवल्याबाबत.दिनांक: १४ नोव्हेंबर २०२५स्थळ: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या दालनासमोरकार्यक्रम: ठिय्या आंदोलनरायपूर (ता. बुलडाणा) येथील ग्रामसेवक श्री. गणेश पायघन यांनी त्यांच्या अतिरिक्त प्रभार काळात विविध विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार व राजकीय दडपणाखाली वागणूक दिल्याबाबत दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पंचायत समिती स्तरावर चौकशीसाठी नियुक्त विस्तार अधिकारी श्री. अरविंद टेकाळे व श्री. गणेश पायघन यांनी तक्रारदारांना विश्वासात न घेता, केवळ औपचारिक चौकशी करून ग्रामसेवकांच्या वाहनातून परत गेल्यामुळे या चौकशीवर संशय निर्माण झाला. या प्रकरणात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर, १७ एप्रिल २०२५ रोजी गटविकास अधिकारी यांनी आदेश क्र. १४०२१ द्वारे श्री. गणेश पायघन यांची बदली करून श्री. अविनाश मानकर यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले. परंतु श्री. पायघन यांनी राजकीय दबाव आणून ही बदली थांबवली. त्यानंतर विस्तार अधिकारी श्री. अरविंद टेकाळे यांनीही ग्रामसेवकाशी संगनमत करून तक्रारदारांना उद्धट उत्तर देत चौकशीमध्ये अडथळा आणला. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रभारी गटविकास अधिकारी श्री. तायडे यांनी कारणे दाखवा नोटीस (क्र. ३१४८/२०२५) दिली होती, मात्र श्री. पायघन यांनी राजकीय हस्तक्षेपाद्वारे ही नोटीस रद्द करवून घेतली. परंतु पुढील पाठपुराव्यांनंतर गटविकास अधिकारी यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश क्र. ३२०५ नुसार नोटीस कायम ठेवली. यानंतर १६ सप्टेंबर २०२५ रोजी आरोग्य शिबिराच्या वेळी श्री. पायघन यांनी राजकीय नेत्यांच्या घरी बैठक बोलावून चुकीची माहिती दिली की, “माझी बदली झाली तर गावातील घरकुल योजना रद्द होईल.” या प्रकारे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी घेतली. तक्रारदार श्री. शेख राजू शेख बुढन आणि श्री. मोह. साबिर मोह. उस्मान यांनी साक्ष दिली. सुनावणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिले की –• रायपूर गावातील सर्व विकास कामांची चौकशी करण्यात यावी.• दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी.• १७ एप्रिल २०२५ चा बदली आदेश कायम ठेवण्यात यावा.यानुसार गटविकास अधिकारी यांनी आदेश क्र. ३७९०, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी बदली आदेश पुन्हा जारी केला. तरीही श्री. गणेश पायघन यांनी गावात दोन गट पाडून राजकीय वातावरण दूषित करण्याचे काम सुरू ठेवले आहे. श्री. पायघन यांनी गावकऱ्यांना चुकीची माहिती देऊन शासनाच्या विविध योजनांबद्दल भीती निर्माण केली आहे. तसेच तक्रारदारांविरुद्ध बदनामी मोहीम राबवून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. यात मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग बुलडाणा (ज्यांनी दि. ११/१०/२०२५ रोजी पत्र क्र. ४१२८ द्वारे बदली थांबवण्याचा आदेश दिला) – हे सर्व अधिकारी राजकीय दडपणाखाली व आर्थिक स्वार्थासाठी कार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. असे आमचे संशय आहे.✊ आमची मागणी:1. श्री. गणेश पायघन व श्री. अरविंद टेकाळे यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी.2. सर्व विकास कामांची आर्थिक तपासणी (Audit) करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.3. साहित्य खरेदी व सर्व कामांची सखोल चौकशी करून अहवाल सत्य देण्यात यावे.4. तक्रारदारांना संरक्षण देण्यात यावे व राजकीय दडपण थांबवावे.📅 ठिय्या आंदोलनाची माहिती:दिनांक: १४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार)स्थळ: जिल्हा परिषद बुलडाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरआयोजक: रायपूर ग्रामस्थ, तक्रारदार नागरिक व सामाजिक कार्यकर्तेरायपूर गावातील अन्यायाविरोधात आम्ही शांत बसणार नाही!सत्यासाठी, पारदर्शकतेसाठी, आणि जनतेच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील.
