
मेहकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची पूर्व तयारी व इच्छुक उमेदवार यांची बैठक/मुलाखती
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
मेहकर येथील महेश मंगल कार्यालय येथे दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाची मेहकर नगर परिषद पूर्व तयारी व इच्छुक उमेदवार यांची मुलाखत बैठक अमरावती येथील जेष्ठ नेते श्री जयंतजी डेहनकर यांच्या पर्यवेक्षणात व मार्गदर्शनात उत्साहात पार पडली.
या बैठकीस उपस्थित राहून भाजपा पक्ष पूर्ण क्षमतेने निवडणूक लढवणार असून मेहकर नगर परिषदेवर भाजचाच झेंडा फडकवीसाठी कार्यकर्त्यांनी व इच्छुक उमेदवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे.
या वेळी बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रकाशजी गवई, जेष्ठ नेते डॉ सुभाष लोहिया, जिल्हा सचिव विजय पवार,मेहकर मंडळ सौ शिल्पाताई देशमुख, मेहकर ग्रामीण अध्यक्ष सारंग माळेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप इलग, यांसह भाजपा पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
