
दिवसा ढवळ्या खून घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी..दिवाळीत मामाच झाला भाच्याचा वैरी..डोक्यात लोखंडी रॉड मारुन घेतला जीव
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
जालना_क्राईम भोकरदन मध्ये दिवसा ढवळ्या खून घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी..दिवाळीत मामाच झाला भाच्याचा वैरी..डोक्यात लोखंडी रॉड मारुन घेतला जीव..परिसरात एकच उडाली खळबळ..डावरगाव फाट्यावर आढळला मृतदेह..घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली भेट ..आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भोकरदन ते जालना या मुख्य रोडवर डावरगाव फाट्यावर एका 27वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे , याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली..व मृतदेहाची पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा परमेश्वर लोखंडे वय 27 वर्ष राहणार भोकरदन शहर याचा असल्याचे समोर आले, पोलिसांनी याची माहिती तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांना दिली, यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी यांनी तात्काळ फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता, खूण झाल्याचे समोर आले असून या ठिकाणी एक क्रूजर गाडी सुद्धा आढळून आली आहे, यामध्ये सदरचा खून झालेल्या मयताचे नाव परमेश्वर लोखंडे वय 27 वर्ष असे असल्याचे निष्पन्न झाले, हा खून मामाने व त्याच्या साथीदाराने केला असल्याचे समोर आले आहे, काही जागेच्या वादावरून हा खून झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आल आहे ,यावेळी पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली असता हा खून अनिल कांबळे, अर्जुन रमफळे यांनी केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे ,या खुना चा तपास पोलीस करत आहे, की त्यांनी परमेश्वर लोखंडे याला का मारले कुठे मारले, व कसे मारले याचा शोध सध्या पोलीस घेत असून मात्र झालेल्या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ..प्राथमिक माहितीत मयत परमेश्वर लोखंडे यांच्या डोक्यात पोटात व हातापायावर लोखंडी रॉड ने जबर मारहाण करण्यात आली आहे ,याचे दोन्हीही हातपाय मोडले गेली आहे व त्याला मारून जालना भोकरदन या मुख्य मार्गावर डावरगाव फाट्यावर आणून टाकले आहे, यामध्ये एक क्रूजर गाडी सुद्धा घटनास्थळावर आढळून आली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे, जागेच्या वादावरून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याप्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे ,पोलीस या खुनाचा कसून शोध घेत आहे.
