दिवाळीपूर्वी पिकविमा न दिल्यास शेतकऱ्यांचे विराट आत्मदहन आंदोलन

दिवाळीपूर्वी पिकविमा न दिल्यास शेतकऱ्यांचे विराट आत्मदहन आंदोलन!

जळगाव जामोद प्रतिनिधी

संग्रामपूर (जि. बुलढाणा) –2024 खरीप हंगामाचा पिकविमा अजूनही न मिळाल्याने संग्रामपूर व जळगांव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयम संपला आहे!शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की —
“जर दिवाळीपूर्वी हक्काचा पिकविमा खात्यात जमा झाला नाही, तर तहसील कार्यालयासमोर विराट आत्मदहन आंदोलन होईल!”शेतकऱ्यांनी वेळेवर विमा भरला, नुकसान झाले, पंचनामे झाले… तरीही आजवर एक रुपया मिळालेला नाही.
दरम्यान सरकार आणि विमा कंपनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत, आणि शेतकरी अंधारात आहेत.आंदोलक : प्रकाश विठ्ठलराव भिसे म्हणाले —“आम्ही हक्क मागतो आहोत, भीक नाही!
दिवाळीत आमच्या घरात दिवे नाहीत, आणि सरकार अजून झोपले आहे.
विमा न दिल्यास तहसीलसमोर आग पेटेल — ती शेतकऱ्यांच्या रोषाची असेल!”शासन आणि विमा कंपनीने तात्काळ निर्णय घेऊन दिवाळीपूर्वी पिकविमा खात्यात जमा करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.आंदोलन: 20-10-2025
वेळ: सकाळी 12 वाजता.!
ठिकाण : तहसील कार्यालय, संग्रामपू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *