सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे लोकशाही वरील प्रहार

सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे लोकशाही वरील प्रहार

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

बुलढाणा भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरचा हल्ला आहे. संविधान व धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई न होता ते मोकाट फिरत आहेत, हे लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे.महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून, वकील राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.या प्रसंगी बुलढाणा जिल्हा मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविकास आघाडीच्या प्रमुख मागण्या • राकेश तिवारी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा • त्यांचा वकिली परवाना कायमस्वरूपी रद्द करावा • घटनेची न्यायिक चौकशी करावी • अशा प्रवृत्तींना पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करावी • न्यायालयीन सुरक्षेची पातळी वाढवावीमनुवादी विचारसरणी व धार्मिक उन्मादातून संविधानिक मूल्यांवर होणारे हे हल्ले देशाच्या एकतेसाठी गंभीर धोका आहेत.संविधानाचे रक्षण हेच आपले कर्तव्य आहे. — राहुल बोंद्रेजिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *