
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश
जळगाव जामोद प्रतिनिधी
जळगाव जामोद एकात्मिक आदिवासी विकास विभाग अकोला अंतर्गत दिनांक 29 सप्टेंबर ते एक आक्टोंबर पर्यंत घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा तरोडा जिल्हा बुलढाणा येथे पार पडल्या, सदर स्पर्धेत आदिवासी आश्रम शाळा जळगाव जामोद यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच केंद्रस्तरीय चॅम्पियनशिप मिळवली सांघिक खेळात( खो खो) मुले ,मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात 100 मीटर, धावणे 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर धावणे व 1500मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. याव्यतिरिक्त 4_100, 4_400 रिले या मुला मुलींच्या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तसेच संपूर्ण खेळाडूंची पुढे होणाऱ्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली खेळाडूंचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले, तर क्रीडा शिक्षक म्हणून देशमुख, व्यवस्थापक म्हणून तडवी, भूमबरे मॅडम, हावरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरे तर सचिव श्रीमती स्नेहा ताई यांनी मुलांचे स्वागत करून पुढे होणाऱ्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
