
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर चे दोन विद्यार्थी जिल्हास्तरावर
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
शा.प्रदि. 24 सप्टेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट चे विद्यार्थी बुलढाणा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. यात शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये अंडर 17 वयोगटा मध्ये करणं विलास चिकटे याने विजय मिळवला तर अंडर 19 वयोगटामध्ये जानवी भिवटे हिने विजय मिळवला. या विजयामुळे दोघांचीही जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धैसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मा. संदीपदादा शेळके व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी अभिनंदन केले आहे. या यशासाठी शाळेचे क्रिडा शिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली.
