
अकोला येथील नगरसेवक अब्दुल रहीम अब्दुल कादर पेंटर यांनी आयुक्त व प्रशासक साहेब यांना निवेदन सादर केले
अमीन शेख ससंपादक शेगाव
अकोला 24 सप्टेंबर 2025 रोजी महानगरपालिकेच्या उत्तर झोन परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची मागणी पुढे आली आहे.नगरसेवक अब्दुल. रहीम अब्दुल. कादर पेंटर यांनी आयुक्त व प्रशासक साहेब यांना निवेदन देऊन उत्तर झोन परिसरात जन्म-मृत्यू नोंदणी शाखा सुरू करण्याची मागणी केली आहे.सध्या हा विभाग नेहरू पार्क शेजारी जुन्या सेंटर जवळ कार्यरत आहे. त्यामुळे उत्तर झोन परिसरातील नागरिकांना विविध कामांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जावे लागते.यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाया जातात.नगरसेवक कादर यांनी सांगितले की, नायगाव/अकोटे फैल सह उत्तर झोन परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक संख्या आहे. त्यामुळे या भागातच जन्म-मृत्यू नोंदणी शाखा सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. यावेळी निवेदन देते नायगाव व अकोट फैल येथील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते
मराठी समाचार न्यूज 24 सठी अमीन शेख ससंपादक शेगाव
