
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बुलढाणा जिल्हा आढावा बैठक शेगाव येथे संपन्न
शेगाव प्रतिनिधी
सप्टेंबर २३, २०२५शेगाव, दि. 23 सप्टेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बुलढाणा जिल्हा आढावा बैठक श्री संत नगरी शेगाव येथील विश्राम भवन येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी बुलढाणा जिल्ह्याचे तिन्ही जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख, गणेश बरबडे व लक्षिमन जाधव हेही विशेषतः उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज, कार्यकर्त्यांची भूमिका आणि येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. पक्षाची धोरणे व विचारसरणी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.या आढावा बैठकीमुळे जिल्ह्यात मनसेच्या चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
