ढगफुटीग्रस्त भागाची पाहणी व तातडीच्या मदतीच्या सूचना

ढगफुटीग्रस्त भागाची पाहणी व तातडीच्या मदतीच्या सूचना

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

आज बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, मढ, गोंधनखेड, ईजलापूर व चौथा परिसरात काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मी प्रत्यक्ष जाऊन केली. शेतजमिनी, पिके व घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून सरसकट मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या धर्मवीरआ.संजुभाऊ गायकवाड* यांनी दिल्या व शेवटच्या घटकातील शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, असे अधोरेखित केले.या पाहणीवेळी बुलढाणा महसुल तहसीलदार श्री. विठ्ठल कुमरे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिव सेना कि.से.जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गायकवाड* तालुका प्रमुख धनंजय बारोटे, सुनील देशमुख, शिवाजी डुकरे, जयेश पवार, विजय पवार, रवींद्र पवार यांच्यासह शिवसेना-युवासेना पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ सहभागी झाले.मी उपस्थितांना सांगितले की, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असला तरी आशा सोडू नका. तुमच्या कुटुंबाला आधार देणे ही माझी प्राथमिकता आहे तसेच प्रत्येक घटकापर्यंत न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे.गिरडा-चौथा रस्त्यावर पूल लहान असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी रस्ता बंद होतो. त्यासाठी नवीन मोठा पूल उभारण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच नदीकाठावरील अतिक्रमण काढून टाकावे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून ही समस्या कायमची दूर करावी, असेही निर्देश तहसीलदारांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *