
शिक्षक बदली संदर्भात गट शिक्षणाधिकारी साहेब यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन
प्रतिनिधी जळगाव जामोद
आज दिनांक 12/09/2025 वार शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी च्यावतीने जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात प्रति मा गटशिक्षणाधिकारी साहेब यांना शिक्षक बदली संदर्भात निवेदन देण्यात आले . हे निवेदन प्रतीलीपी मा गटविकास अधिकारी यांना सुध्दा देण्यात आले आहे. निवेदनाचा प्रमुख विषय असा की, आपल्या पंचायत समिती अंतर्गत शिक्षक बदली साठी,शिक्षकांना कार्यमुक्त न करणे बाबत देण्यात आले. आपल्या पंचायत समिती जळगाव जामोद तालुका अंतर्गत बडलीप्रप्त शिक्षक संख्या 28 इतकी आहे आणि इतर तालुक्यातून येणारी शिक्षकांची संख्या 09 इतकी आहे. ही तुलना पाहता आपल्या पंचायत समिती ला येणारी शिक्षक संख्या फार अल्प आहे.यामुळे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया ही खंडित होऊ शकते.आपल्या शाळांमधील पटसंख्या पाहता.आपल्यालाच शिक्षकांची कमतरता जाणवत आहे.त्यामुळे आमची मागणी रास्त आहे की जो पर्यंत इतर तालुक्यातून आपल्याला शिक्षकांचा आकडा समाधान कारक येत नाही तोपर्यंत आपल्या पंचायत समितीमधील शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. जर आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद च्यावतीने तीव्र आंदोलन करणार आहों असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक,ज्येष्ठ नेते साहेबराव भगत, ता महासचिव श्रीकृष्ण गवई सर,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई,ज्येष्ठ नेते बाबूरावजी तायडे,ज्येष्ठ नेते अताउल्ला खान,भा बौ महासभा ता अध्यक्ष जगदीश हातेकर, ता उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे,तालुका सचिव सुरेश वाघोदे, ता उपाध्यक्ष गुणवंत मेटांगे,शहर अध्यक्ष आझम कुरेशी,सुनील इंगळे,लोकपाल भगत ,सुनील भटकर अमोल तायडे धम्मपाल निंबाळकर संतोष वारे दादाराव धनगर योगेश वाकोडे आत्माराम वाकोडे ,दामू सपकाळ,सुभाष शेगोकार,शाहीर अनिल हेलोडे,ज्ञानेश्वर कोकाटे,भास्कर जुंबळे, बाळू तायडे, सुदाम गवई, शांतशिल वानखडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
