ईद-ए-मिलाद-उन- नबी निमित्ताने पारध येथे सामाजिक बांधिलकी जपत एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

पारध येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्नपारध (ता. भोकरदन, जि. जालना) :जश्ने ईद-ए-मिलाद-उन- नबी निमित्ताने पारध येथे सामाजिक बांधिलकी जपत एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी मोहम्मदिया शादी हॉल येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन स्थानिक मान्यवर, पोलिस अधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले.शिबिरात शेकडो युवक-युवतींसह वयोवृद्धांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या घोषवाक्याने प्रेरित होऊन सर्व दात्यांनी पुढाकार घेतला. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकातील लोक एकत्र येऊन मानवतेच्या सेवेसाठी पुढे सरसावले.या प्रसंगी पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी समाजोपयोगी उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर आयोजकांनी रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात, म्हणून वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करण्याचा संकल्प करावा, असे सांगितले.रक्तदानानंतर सर्व दात्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच आयोजकांच्या वतीने अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे पराध परिसरात सामाजिक ऐक्य व बंधुता अधिक दृढ झाली.शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळातील कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजातील तरुणाईने पुढाकार घेतल्यामुळे पराध येथे रक्तदान चळवळ अधिक जोमाने पुढे नेली जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. क्रायक्रमाचे उदघाटन पारध पो.स्टे. चे API माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुसलीम पंच कमेटी अध्यक्ष अज़हर पठाण सर,अज़ीज सेठ,मनिष भैय्या श्रीवास्तव,हाफीज खलील साहब,सलीम खान,शेख आबेद, शेखर श्रीवास्ताव, नसीर सेठ,लतीप सेठ, साबेरसेठ, निसार सेठ, हाफीज़ शाहरुख साहब,मुफ्ती इम्रान साहब,मुफ्ती अबुसाद,संग्राम राजे,एन. एम. लोखंडे सर, बबलु तेलंग्रे, समाधान बोडखे, अमोल भुसारे, अनुज श्रीवास्तव, बाबा खान, समी खान, बाबुखान,सर्व गावकरी बांधव व पत्रकार मंडळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *