साकेगांव येथील दारूबंदी साठी महिलांचे आमरण उपोषण

साकेगांव येथील दारूबंदी साठी महिलांचे आमरण उपोषण

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साकेगांव या गावात सऱ्हास आणि उघडपणे अवैध्य देशी विदेशी दारू विक्रीला उत आला असून, दारूपाई असंख्य कुटुंबाला आणि विशेष महिलांना नरक यातना भोगाव्या लागत होत्या, याला कंटाळून गेल्या वर्षी संपूर्ण साकेगावतील लहान मोठे आणि महिलांसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून दारू बंद करण्यासाठी मोर्चा नेला होता. त्यानंतर काही काळ अवैध्य दारू बंद झाली, परंतु सद्य स्थितीत गावामध्ये अवैध्य दारू विक्रीला उत आला असून अनेक लहान मुले व्यसनाधीन झाले आहेत. दारुसाठी घरातील आई वडिलांना मारहाण करून घरातील डाळ धान्य, तसेच इतर प्रकारच्या दारु पिण्यासाठी चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. तर या दारू मुळे अनेकांनी आत्महत्या करून संसार उघड्यावर पडले आहेत. गावातील तरुण पिढी व्यसनधीन होत असल्याने महिला व मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रास सहन कराव लागत आहे. त्यातच वयोवृद्ध आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन आयुष्य धोक्यात आले आहे. हे मुद्दे घेऊन साकेगांव, चिखलीतील सैलानी नगरपर्यंत चे सगळे अवैध्य धंदे कायमचे बंद व्हावे यासाठी गावातील महिला सौ. कांताबाई धोत्रे, श्रीमती. नंदाबाई लष्कर, श्रीमती. लक्ष्मीबाई लष्कर यांच्या सह अनेक महिलांनी दि. २ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक साकेगांव येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणस गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, तरुण मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी पाठिंबा दिला आहे. महिला मंडळी दारु बंदी साठी उपोषणास बसल्यामुळे त्या महिलांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडे चांगल्या तरुण मुलाची टीम तयार करून दारूबंदी साठी समोर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी विशेष ग्रामसभे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *