वनविभागाचा एकच नारा झाडे लावा आणि झाडांची कत्तल करा

वनविभाग झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम घेत आहे आणि दुसरीकडे वनविभागाचा एकच नारा झाडे लावा आणि झाडांची कत्तल करा भाग दोन भाग

जळगाव जामोद मुख्य संपादक नागेश भटकर

वनपरिक्षेत्रामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. जळगाव जामोद व खांडवी तसेच भेंडवळ राऊंड मधील . एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही.वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नुकसान वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वता मधील सागवान लाकडाचा मोठ्या प्रमाणात साठा बाहेर जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. कटाई होऊन त्याकडे वनरक्षक वनपाल तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही. सर्रास वृक्षतोड सुरू आहे. याचा लाभ सागवान तस्कर घेत आहे. महाराष्ट्रातील मध्यप्रदेशच्या मार्गावर निमखेडी फाटा येथील नाक्यावरून सागवान चे मोठा प्रमाणात वाहतूक होत आहे यामध्ये सुमारे मोठे मोठे वृक्ष आवैध सागवान पडून आहे. यापेक्षा अधिक माल येथून लंपास केल्याचे दिसून येते. कोणतीही परवानगी न घेता तोडलेले सागवान बाजूला मातीच्या ढिगाºयात दडविण्यात आले आहे. आता कामादरम्यान माती बाजूला पडताच सागवान लाकडाचा ढिगच बाहेर आला आहे. हॅमर नसलेले सागवान दिसून येते.या लाकडाबाबत वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेवरच संशय व्यक्त केला जात आहे. लाखो रूपयांचे सागवान बेवारस कत्तल होत आहे आतापर्यंत वनविभागाने कोणतीही दखल घेतली नाही. चोरट्यांनी लाखो रुपयाचे सागवानी लाकूड चोरून नेले असून स्थानिक जळगाव जामोद तालुक्यातील वन विभागातील काही कर्मचारी तसेच वनरक्षक तसेच वनपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात सागवानचे कत्तल होत आहे मात्र प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने कुणीच कारवाईसाठी पुढे येताना दिसत नाही. चोरट्यांनी कटाई केल्यानंतर सागवान झाडांची थूट खोदून पुरावा नष्ट केला गेला.तोडून ठेवलेले सागवान कुणाचे आहे याची माहिती नाही. सादर झाडांची POR दोन किंवा तीन झाडांची दाखवल्या जात आहे सादर बाकीचे झाडांची POR होत नाही कारण जास्त झाडांची POR झाली तर यामध्ये वनरक्षक वनपाल तसेच Range Forest Officer हो यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई होते या कारवाईसाठी कोणीही वन विभागाचे अधिकारी कमी प्रमाणात सागवान झाडांची POR कमी प्रमाणात फाळण्यात येतो भाग तीन लवकरात प्रकाशित होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *