
अखेर आमरण उपोषण पाचव्या दिवशी लेखि आश्वासनाने सुटले
प्रतिनिधी जळगांव जामोद
दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पळशी सुपो येथील ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या अनियमीतते विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते व पळशी सुपर येथील संतोष सोनवणे हे सुद्धा घरकुलाच्या जागेसाठी जागा नियमाकुल करण्यासाठी आमरण उपोषणास बसले होते गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते अखेर पंचायत समिती जळगाव जामोद चे बि डि ओ संदिप मोरे यांनी लेखी पत्र देऊन दोन्ही उपोषण कर्ते यांनी उपोषण मागे घेतले यावेळी पंचायत समिती बि डि ओ संदिप मोरे,वंचित चे नेते रतन नाईक, देवा दामोदर ,सुनिल बोदडे, उपसभापती प्रशांत अवसरमोल, प्रमोद कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य राजु शेगोकार,रोशन तायडे,ग्रामसचिव श्री ढगे,व पंचायत समिती चे अधिकारी व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते हजर होते.
