अरे रे ऐकावे तितके नवलच जा तालुक्यातील असलेले वनजंगलामध्ये लाखो रुपयांच्या सागवान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल

अरे रे ऐकावे तितके नवलच जा तालुक्यातील महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेल्या वनजंगलामध्ये लाखो रुपयांच्या सागवान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील सातपुडा पर्वत मधील वन जंगल मध्ये मोठ्या प्रमाणात सागवांची कत्तल होत आहे तरीसुद्धा वनविभागाचे दुर्लक्ष यामध्ये मोठे मोठे झाडांची कत्तल तसेच इतर काही वनस्पती यांची पण कत्तल होत आहे यामध्ये वनविभागाचे अधिकारी वनपाल तसेच वनरक्षक हे त्यांच्या बीटमध्ये जात नसून या गोष्टी घडून येत आहे अनेकदा वरिष्ठांना माहिती देऊनही यामध्ये फक्त दोन किंवा तीन झाडांचा POR फाडण्यात येते आणि बाकीच्या झाडांचा POR फाळण्यात येत नाही यामध्ये कुठेतरी शंका निर्माण होते की अधिकारीच हे झाड विकत तर नसती सागवान झाडांची चोरांना मदत तर करत नसतील अशी शंका सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते यामध्ये अनेकदा मोठ्या मोठ्या झाडांची कत्तल होते तसेच नदीच्या पात्राजवळ सागवान चे झाडांची साल पाहायला मिळते यामध्ये जर कोणी साधारण व्यक्ती माहिती दिली तर त्याला धमकी देण्यात येते की ही झाडं सागवांची तुम्ही तर तोडली नसतील असे सर्व साधारण व्यक्तीला धमकी दिल्या जाते येते हा व्यक्ती माहिती देण्यास मग टाळाटाळ करतो आणि लाखो रुपयांचे सागवान चे मोठे मोठे झाडांची कत्तल केल्या जाते वनविभागाचे कर्मचारी फक्त बाहेरून फेरफटका मारतात आणि आत मध्ये कधीही गस्त लावत नाही अनेकदा हे प्रकार घडले आहे मागील वर्ष मध्ये भिंगार गावामध्ये लागून असलेले नदीच्या काठी दीड एकर शेती गांजाचे पूर्ण शेती पिकवण्यात आली होती तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही किंवा माहिती असूनही कोणतीही कारवाई झाली नाही वनपाल वनरक्षक वन मजूर यांनी जर जंगलामध्ये गस्त लावली असती तर आज एवढी मोठी प्रकरण घडले नसते तसेच अनेक आदिवासी भागातील गावाला लागून असलेली जंगलामध्ये सागवानच्या मोठ्या मोठ्या झाडांची कत्तल केली जाते यामध्येही वन विभागाचे कारवाई मात्र शून्य पाहायला मिळते आतापर्यंतचा जर सर्वे पाहिला तर जळगाव जामोद तालुक्यामध्ये सागवानच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *