कापसा वरील आयात शुल्क वाढवा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांची मागणी

कापसा वरील आयात शुल्क वाढवा – राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांची मागणी

जळगाव जामोद प्रतिनिधी

गेल्या मागील आठवड्या मध्ये केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकर्याच्या या हंगामात येणार्या कापसाचे भाव प्रचंड कमी होण्याची शक्यता आहे. आधीच अस्मानी संकटाने हवालदिल झालेला शेतकरी आणखी हलाकिच्या परिस्थितीत जाईल. विदर्भामध्ये कापूस हे मुख्य पिक आहे या आयात शुल्क माफीच्या निर्णयामुळे आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त ओळख असनारा विदर्भातील शेतकरी संकटात सापड़नार आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या मार्फ़त केंद्रीय कृषि मंत्री भारत सरकार यांनी आमची कापसावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करन्यात येईल या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष ईरफान खान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम.डी. साबीर,महादेव भालतडक, आशिष वायझोडे, एजाज देशमुख, सिद्धार्थ हेलोड़े, सुहास वाघ, महादेव उगले,खालिद माही, रोशन गावंडे, अंकित हेलोड़े, विलास उगले, योगेश गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *