
अकोला तालुक्यात मासा सिसा ऊदेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रक्तदान शिबिर यशस्वी
अकोला जिल्हा प्रतिनिधी
24 ऑगष्ट रोजी अकोला तालुक्यातील मासा सिसा ऊदेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष सतीश मधुकरराव फाले आणि अकोला ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हात मागिल काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भाषत आहे रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी रक्तपेढ्या मार्फत सामाजिक व राजकीय संस्थाना आव्हान करण्यात आले आले आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश मधुकरराव फाले यांनी तात्काळ रक्तदान शिबीर आयोजित करुन सामाजिक बांधिलकी चा परिचय दिला रक्तदान शिबीराला श्री शिव प्रतिष्ठान व लहुगर्जना मित्रमंडळाने प्रतिसाद देत शेकडो च्या वर तरुणांनी रक्तदान केले व समाजातील सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन केले.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले ओम बोळे मोहन फाले गोपाल इंगळे ऋषिकेश बोळे शेखर स्वर्गीव प्रदिप आखरे संचित फाले निलेश आगरकर धनराज सहारे रोशन राऊत अजय राऊत नारायण मेहरे माधव येळे आदित्य घाटोळे अजय सरकटे चेतन शेंद्रे रोशन स्वर्गीव प्रतिक बोळे नंदकिशोर येळे सह मनसैनिकांनी मेहनत घेतली
