बालभारतीशी निगडित समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार

बालभारतीशी निगडित समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार पश्चिम अकोला आमदार साजिद खान पठाण यांची ग्वाही

अमीन शेख सहसंपादक

अकोला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतल्या भूमिकेची प्रशंसा करत, बालभारतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार विधानसभेत ठामपणे आवाज उठवण्याची ग्वाही अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिली.शनिवारी पुणे येथील बालभारती विभागाला आमदार पठाण यांनी भेट दिली. ही घटना ऐतिहासिक ठरली कारण प्रथमच एका चिकित्सक लोकप्रतिनिधीने स्वतःहून बालभारती विभागाला भेट देऊन तेथील कामकाज आणि समस्या जाणून घेतल्या. मराठी, हिंदी आणि उर्दू साहित्याचे अभ्यासू वाचक असलेल्या पठाण यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. कविसंमेलन, मुशायरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच कलावंत आणि लेखकांच्या पाठराखणीसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.भेटीदरम्यान बालभारतीचे अधिकारी, कार्यशाळेसाठी आलेले शिक्षक, तसेच उर्दू विभागातील प्रख्यात शायर नईम फराज, मोहसीन अमीन, वसीम फरहत, मतीन तालीब, वासिक नवेद यांच्याशी आमदार पठाण यांनी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या समस्या त्यांनी आस्थेने ऐकून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण शामराव केंद्रे, अधिकारी खान नवेदुलहक, सहाय्यक अधिकारी नासिर अली शेख, यासीन आजमी यांनी आमदार पठाण यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार केला. तसेच msert चे उर्दू प्रमुख तौसिफ परवेज, अंजुमन इस्लामी मुंबईचे उपाध्यक्ष अब्दुल्ला शेख, लिपिक इंद्रसेन भोवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासिक नवेद यांनी केले तर आभारप्रदर्शन वसीम फरहत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *