काँग्रेस शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी दिनेश काटकर

काँग्रेस शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी दिनेश काटकर

जळगाव जामोद प्रतिनिधी

जळगाव जामोद, ता. १० :भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धडाडीचे युवा कार्यकर्ते दिनेश काटकर यांची काँग्रेस शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय राष्ट्रीय दिनेश काटकर काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, राष्ट्रीय अध्यक्ष सोखपालसिंह खैरा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष संभाजीराव शिर्के यांनी दिनेश काटकर यांना ता. ९ ऑगस्ट रोजी नियुक्ती पत्र देवून त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या मार्गी लावण्याची दृष्टीने काटकर हे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला. त्यांच्या नियुक्ती बद्दल काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष अॅड. भाऊराव भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *