
नैतिक मूल्य जपणाऱ्या पत्रकारितेची आज नितांत गरज मलकापूर येथे आयोजीत मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलनात उमटला सूर
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय मलकापूर वेदाच्या मीडिया विभाग व पत्रकार संघ मलकापूर यांच्या वतीने ता. ६ ऑगस्ट रोजी मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रम्हपुरी ईश्वरीय विश्वविद्यालय, मलकापूर केंद्राच्या प्रमुख संचालका गितादीदी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल कॉर्डिनिटर, माउंट अबू येथील डॉ.शांतनू भाईजी तसेच अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, नटराज चांडक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले. ब्रह्मकुमारी अन्यों चांडक हिने स्वागत नृत्य सादर करत उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी संचालिका गीता दीदी यांनी स्वागत संबोधन केले, त्यानंतर डॉ. शंतनू भाईजी यांनी आपल्या मार्गदर्शनात सकारात्मक पत्रकारिता आणि समाजामध्ये सद्भाव, प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून नैतिक मूल्य जपणारी पत्रकारितेची आज गरज आहे असे सांगितले, तसेच मलकापूर दीप प्रज्चतन करून संमेलनाचे उद्घाटन करताना मान्यवर ब्राह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्याल मीडिया विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या महत्वाच्या उपक्रम व कार्यक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली व आगामी काळात माउंट अबू येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनात पत्रकार बांधवांनी सामिल होण्याचे आवाहन केले. यानंतर ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर यांनी मार्गदर्शन करून

पत्रकारितेविषयी भूमिका मांडलो. संमेलनासाठी शहरातील पत्रकार विरसिंह राजपूत, समाधान सुरवाडे, दीपक इटणारे, अजय टप, गजानन ठोसर, विलास खर्चे, शेख जामीन शेख जान मोहम्मद, सुधाकर तायडे, गौरव खरे, कैलाम काले, विनोद व्यवहारे, मनोज पाटील, नागेश सुरंगे, श्रवण पाटील, विश्वनाथ रामापुरकर, शेख इरफान यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन ब्रङकुमारी दिपालीदीदी यांनी तर प्रास्ताविक ब्रह्मकुमारी अंकिता चंडक व आभार पुष्पा दीदी यांनी केले.
