
पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पवार यांचे दुःखद निधन.. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल रमाकांत पवार यांचे दिनांक २८ जुलै रोजी वयाच्या ४५ व्या वर्षी ड्युटीवर हजर असताना दुःखद निधन झाले.. अमोल पवार हे स्थानिक तहसील कार्यालयातील ट्रेझरीवर ड्युटीवर तैनात असताना त्यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना रुखमाई हॉस्पिटल डॉक्टर मारोडे यांच्याकडे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. डॉक्टर मारोडे यांनी अमोल पवार यांना तपासले व मृत घोषित केले. नंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले होते त्यांचे पीएम झाल्यानंतर घरापासून अंत्ययात्रा काढून हिंदू स्मशानभूमी नांदुरा रोड मुंदडा पेट्रोल पंप मागे या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा, जळगाव ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात शोकसलामीची मानवंदना देऊन पार्थिवाला अग्नी देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा आप्तपरिवार आहे.अंत्यसंस्कारावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे, पोलीस नाईक शांतीलाल धिरबस्सी, निलेश पुंडे, गोपनीय विभागाचे बाळकृष्ण पवार,सचिन राजपुत, प्रशांत डामरे, स्वप्निल झुंजारकर यांचेसह जळगाव जामोद शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
