
पोलिस दलाचा अनोखा उपक्रम : सैलानी दर्गा परिसरात अंधश्रद्धा निर्मूलनाची जाणीव
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
भाविकांची सुरक्षितता हेच खरे पोलिसांचे धर्मकार्य — रायपूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम रायपूर, ता.पोलिस दल म्हणजे फक्त कायदा-सुव्यवस्था राखणारे नाही, तर ते समाजाचे खरे संरक्षकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलीस स्टेशन रायपूर हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात घेण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी जनजागृती कार्यक्रमाने भाविकांच्या सुरक्षेबाबत पोलिस दलाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक श्रद्धेचा सन्मान राखून समाजात चालणाऱ्या भोंदूगिरी, अघोरी प्रथा आणि फसवणुकीच्या प्रकारांवर पोलिसांनी ठाम भूमिका घेतली.हा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. नीलेश तांबे, मा. अ.पो. अधीक्षक श्री. अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला. ठाणेदार स.पो.नि. दुर्गेश राजपूत यांनी या कार्यक्रमाचा संकल्प घेत भाविकांच्या आस्थास्थानी असलेल्या सैलानी दर्गा परिसरातच जनजागृतीचे आयोजन केले.कार्यक्रमात संत गाडगेबाबा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावतीचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण धोटे यांनी अंधश्रद्धेचे प्रकार, जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती आणि शास्त्रीय प्रयोगांच्या माध्यमातून उपस्थित 300 हून अधिक भाविकांना जागृत केले.पोलिसांची भूमिका इथे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी नसून, भाविकांची सुरक्षा, श्रद्धेचा आदर राखणारी आणि अंधश्रद्धेविरुद्ध उभी राहणारी ठरली.कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: सैलानी दर्गा परिसरात पहिल्यांदाच अंधश्रद्धाविरोधी जनजागृती शास्त्रीय प्रयोगांद्वारे अघोरी प्रथा व भोंदूगिरीचे भांडाफोड धार्मिक श्रद्धा अबाधित ठेवत, फसवणूक टाळण्याचे कृतिशील पाऊल दर्गा ट्रस्ट, मुजावर कुटुंब व ग्रामस्थांचे भरघोस सहकार्यकार्यक्रमास माजी पंचायत समिती अध्यक्ष चांद मुजावर, दर्गा ट्रस्ट अध्यक्ष समद खान, पत्रकार, फुलविक्रेते, पोलिस पाटील, पोलिस अंमलदार राहुल जाधव, अख्तर शेख अनंत कळमकर व इतर पोलीस अंमलदार आणि मुजावर कुटुंबीय यांची उपस्थिती होती.प्रमुख वक्तव्य: भाविकांची श्रद्धा अबाधित राहावी, पण कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून हा कार्यक्रम दर्गा परिसरातच घेण्याचा निर्णय घेतला,” असे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. धोटे यांनीही पोलिस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, “धार्मिक स्थळी अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम घेणे हे ऐतिहासिक पाऊल आहे,” असे गौरवोद्गार काढले संदेश स्पष्ट आहे:पोलिसांचा गणवेश हा केवळ अधिकाराचा नाही, तर संवेदनशीलतेचा देखील प्रतीक आहे.”भाविक सुरक्षित असतील, तरच श्रद्धा टिकेल आणि ती जबाबदारी पोलिस दलाने स्वीकारली आहे प्रस्तुतकर्ता: स.पो.नि. दुर्गेश राजपूत ठाणेदार, पो.स्टे. रायपूर जिल्हा बुलढाणा
