
मतिमंद बालक निवासी विद्यालय येथे माजी सैनिक संघटने तर्फे कारगिल विजय दिवस साजरा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर आज दिनांक 26 7 2025 रोजी मतिमंद बालक निवासी विद्यालय येथे माजी सैनिक संघटने तर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुलसिंग परमार हे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राजू पाटील माजी नगरसेवक उपस्थित होते सर्वप्रथम कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कारगिल विजय दिनानिमित्त जमलेल्या माजी सैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर राजू पाटील यांनी बोलताना सांगितले की मी माझे अहोभाग्य समजतो की मी आज आपणा मध्ये उपस्थित आहे व आपण मला नीमंत्रीत केल्याबद्दल आपले धन्यवाद सुद्धा मानतो .कारगिल युद्धामध्ये ज्या सैनिकांनी पराक्रम केला ते सैनिक मलकापूरात हजर असताना सुद्धा त्यांच्याबाबत मलकापूर परिसर अंधारात आहे त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नाही परंतु त्या माजी सैनिकांन बाबत मलकापूर शहरात नागरीकांना माहिती मिळावी या करीता तसेच आपल्या मलकपुरा तील माजी सैनिकांनी कारगिल युद्धामध्ये काय पराक्रम केला हे मलकापुरातील जनतेपर्यंत आपण आपल्या संघटनेमार्फत पोहोचवू तसेच माजी सैनिकांना त्यांच्या हक्काचे असे कार्यालय हवें जेणेकरून त्यांच्या समस्या, त्यांचे पत्र व्यवहार त्यांच्या अडचणी एका ठिकाणी येऊन ते सोडवल्या जातील अशा कार्यालया करीता जागा त्यांना मिळावी या करीता नगर पालिका निवडणुकीनंतर नगरपालिकेमार्फत सहा महिन्यानंतर त्यांना जे कागदपत्र , ठराव लागतील ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ तसेच युवक सैन्यामध्ये भरती होण्याकरिता प्रोत्साहित करण्याकरिता सैनिकांबद्दल प्रेम वाढवण्याकरिता शहारा मध्ये विविध कार्यक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येतील असे बोलताना सांगितले त्यानंतर माजी सैनिकांनी तसेच मतिमंद बालक निवासी विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहली त्यानंतर माजी सैनिक संघटनेतर्फे मतिमंद बालक निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले त्यांच्यासोबत सर्व अतिथी व माजी सैनिकांनी जेवण केले या कार्यक्रमा करिता मलकापूर शहर तालुक्यातील सर्व माजी सैनिकांनी मेहनत घेतली व कार्यक्रम उत्साहाने पार पाडला
