
महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन च्या वतीने नागपूर विभाग उपाध्यक्षपदी मलकापूरचे विधीज्ञ विकास प्रेमचंद महाजन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर: महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन च्या वतीने नागपूर विभाग उपाध्यक्षपदी मलकापूरचे विधीज्ञ विकास प्रेमचंद महाजन(जैन) अॅडव्होकेट अँड नोटरी (भारत सरकार) यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन चे अध्यक्ष विधीज्ञ अॅड सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष अॅड यशवंतराव खराडे, उपाध्यक्ष अॅड नितेश लालवानी, अॅड महावीर कांकरिया, अॅड अब्दुल बटी, अॅड सुमितलाल बलदोटा, अॅड प्रवीण नलावडे, विभागीय अध्यक्ष अॅड अरफाक शेख आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी एक मताने मलकापूरचे अॅड विकास महाजन (जैन) यांची नागपूर विभाग विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली दरम्यान असोसिएशनला योग्य मार्गदर्शन व सहकार्याबद्दल विश्वास व्यक्त केला. या निवडीबद्दल अॅड विकास महाजन (जैन) नोटरी (भारत सरकार ) यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
