
श्रमदानातून बुजविले राज्यमार्गाचे खड्डे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- गौरव मेले
चंद्रपूर :- सिंदेवाही तालुक्यातील वासेरा-गडबोरी राज्यमार्गावर जिवघेण्या खड्ड्यात मुरुम टाकून बुजविण्याचे काम महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लबने श्रमदानातून केले आहे.गडबोरी-वासेरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाहीचा दुर्लक्ष झाल्याने अपघातांची शक्यता वाढली होती.या पार्श्वभूमीवर महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लब, वासेरा या युवकांनी पुढाकार घेत श्रमदान करून युवक हातात फावडे, घमेली घेऊन स्वतः मुरुम टाकत खड्डे बुजवले या सामाजिक उपक्रमात वैभव उज्वावकर, महेंद्र कोवले,सूरज कोडापे,घनश्याम मेडीवार, आकाश रणदिवे, सागर कुंभरे यांचा सहभाग होता.
